संतापजनक ! टेक्निशियनने  एक्स-रेसाठी आलेल्या तरुणीला कपडे  काढायला सांगितले आणि ..
संतापजनक ! टेक्निशियनने एक्स-रेसाठी आलेल्या तरुणीला कपडे काढायला सांगितले आणि ..
img
दैनिक भ्रमर
राज्यात दिवसेंदिवस महिला अधिकच असुरक्षित होत आहेत ,दर दिवशी महिलांवर अत्याचाराच्या बातम्या ऐकायला मिळतात दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून  समोर आलीय. एका तरुणीचा विनयभंग करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे ही घटना संभाजीनगरच्या प्रसिद्ध घाटी रुग्णालयात घडली आहे. 

घाटी रुग्णालयात एक तरुणी एक्स रे करण्यासाठी आली होती.  रुग्णालयातल्या टेक्निशियनने तरुणीला कपडे काढायला सांगितले. त्यानंतर नराधम टेक्निशियनने तरुणीला स्पर्श करत अश्लील चाळे केले. तरुणीने ही माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी वासनांध टेक्निशियनला चांगलाच चोप दिला. घाटी रुग्णालय प्रशासनाने केलेल्या तक्रारीनंतर या नराधम टेक्निशियनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. 

धक्कादायक बाब म्हणजे तरुणीवर अत्याचार करणारा हा आरोपी घाटी रुग्णालयामध्ये कामाला नाही.. रुग्णालयाच्या एक्स रे विभागात काम करणारी महिला टेक्निशियन गर्भवती असून ती रजेवर आहे. त्यामुळे आरोपीला एक्स रे काढण्यासाठी बाहेरुन बोलावलेलं होतं. कोविड काळात आरोपी काही दिवस रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. सध्या या आरोपीचा आणि रुग्णालयाचा काहीही संबंध नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केलाय. रुग्णालयात कार्यरत असलेल्या त्या महिला टेक्निशियनवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.. 



इतर बातम्या
Join Whatsapp Group