"जो में बोलता हूं, वो करके दिखाता हूं"; नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण .....
img
Dipali Ghadwaje
नांदेड : लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ दिली. सध्या भाजपकडून लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक चव्हाणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे.

अशोक चव्हाणांनी आपल्या नांदेड जिल्ह्यापासूनच प्रचार सभांचं आयोजन केलं आहे. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी अशोक चव्हाणांच्या प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं. याच सभेत जो बोलता हूं, वो करके दिखाता हूं, असं वक्तव्य करुन अशोक चव्हाणांनी भर सभेत धडाकेबाज डायलॉगबाजी केली.             

काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेत अशोक चव्हाण भाजप उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन करतात. रात्री बिलोली शहरात आयोजित सभेत अशोक चव्हाण यांनी चांगलीच फिल्मी डॉयलॉग बाजी केली. अशोक चव्हाणांच्या फिल्मी डायलॉगबाजीनंतर उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडात करण्यात आला.                                         

भाजप नेते अशोक चव्हाण म्हणाले की, "भाजपचे जुने लोक आणि काँग्रेसमधून आज भाजपमध्ये सामील झालेले लोक आहेत. त्यामुळे आता आपली ताकद डबल होणार आहे. आपली शक्ती डबल होणार आहे. डबल ताकद झाल्यावर और किसीको देखने की जरुरत नही है. प्रतापराव और हम अलग अलग थे. सात, दस साल से, वो मेरेको पानी में देखते थे और मैं उनको देखता था. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नही की सामने एक और पिछे एक. जो में बोलता हूं, वो करके दिखाता हूं. मग ते विकासाचं काम असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत वा आत्महत्याग्रस्तांचे प्रश्न असो."           

इतर बातम्या
Join Whatsapp Group