राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरध्ये भरधाव कारने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भरधाव कारच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड पैठण रस्त्यावरील लिंबेजळगाव येथे घडली आहे. दत्तात्रय बाबुराव चोरमारे असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दत्तात्रय चोरमारे हा युवक थेरगाव येथील काम अटपून दुचाकीने घराकडे निघाला होता.
यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव चार चाकी वाहनाने दत्तात्रयच्या दुचाकीला धडक दिली. यात दत्तात्रेय दूरवर फेकला गेला. या त्याच्या मेंदूला गंभीर मार लागला.
दरम्यान याच रस्त्याने जाणाऱ्या माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने दत्तात्रय याला बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून दत्तात्रय याला मृत घोषित केले. हा अपघात इतका भीषण होता की कारचाही चक्काचूर झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.