नाशिकमध्ये भक्तीचा महासागर! 6,500 आदिवासी बांधवांनी केली महागंगा आरती
नाशिकमध्ये भक्तीचा महासागर! 6,500 आदिवासी बांधवांनी केली महागंगा आरती
img
Nandini khandare More

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा सोहळा पाहायला मिळाला. महागंगा आरतीच्या भव्य आयोजनात तब्बल 6 हजार 500 आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या या आरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. 

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ मेळ्याची सुरुवात ध्वजारोहणाने होत आहे. या सोहळ्याला भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सनातन धर्म श्रद्धेचे महापर्व मानले जाते. दोन वर्षे हा सोहळा रंगणार असून या सोहळ्यात आज महागंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. 

या धार्मिक सोहळ्यात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत साडेसहा हजार आदिवासी महिला आणि पुरूष भाविकांनी या गंगा महाआरतीमध्ये सहभाग घेतला. यावेळी संपूर्ण वातावरण धार्मिक आणि पवित्रमय झाले होते. या नयमरम्य सोहळ्याची नोंद गिनीज बुकमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group