"त्या" प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक
img
Dipali Ghadwaje
पुणे (भ्रमर वृत्तसेवा) :- पुण्यातील कल्याणीनगर मध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी आता ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी सात जणांना अटक झाली आहे.

19 मे रोजी झालेल्या अपघतात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत अल्पवयीन मुलगा कार चालवत होता. त्याच्या वडिलांसह आजोबांना याआधी अटक झाली आहे.  याबाबत समोर आलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट ससून रुग्णालयामध्ये पाठवले होते, परंतु ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केले गेले आहेत असा आरोप डॉक्टरांवर करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हरलोर यांना आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group