यशश्री शिंदेची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली. उरणमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना मिळाले आणि खळबळ उडाली. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केलं. 25 जुलै रोजी यशश्रीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 30 जुलै रोजी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकून कोर्टात हजर केलं.
आरोपी दाऊदला कोर्टानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याची चर्चा आधी सुरू होती. पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर प्राथमिक माहिती मिळाली ती अत्यंत धक्कादायक आहे.
आरोपीनं आपला गुन्हा कबूला केला आहे. त्याला या कृत्याचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचं समोर आलेल्या फोटोंमधून दिसत आहे. इतकंच नाही तर त्याने चौकशीदरम्यान दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळू शकतं.
खूनाच्या गुन्ह्यात अटक आरोपी दाऊद शेखवर आणखी एक ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशश्रीला शिवीगाळ केल्या प्रकरणी आणखी एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाऊद शेखने खुनाची कबुली दिली असून यावेळी त्याच्या सोबत कुणी दुसरा नसल्याचे जवळपास स्पष्ट केलं. पोलिसांच्या चौकशीत खुनाचे कारण स्पष्ट झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यशश्रीने दाऊदच्या लग्नाला नकार दिला होता. ती लहान असताना तिच्या वडिलांनी जबरदस्ती त्याच्यावर पॉस्कोंतर्गत गुन्हा लावला होता. त्यानंतर दाऊदला सहा महिने तुरुंगात राहावं लागलं होतं. बेल मिळाल्यानंतर बाहेर आल्यावर त्याने पुन्हा यशश्रीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
काही काळात आणखी एकजण तिच्या आयुष्यात आला, त्यावेळी दाऊदने तिला लग्नाची मागणी केली. माझं आयुष्य खराब झालं, तुझ्यामुळे मला सहा महिने तुरुंगात राहावे लागले, घरातील माणसे माझ्याशी बोलत नाहीत आता तू माझ्याशी लग्न कर असा तगादा त्याने लावला. यावर तिने नकार दिल्याने तिची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.