बाप की वैरी ! वडिलांनी मुलीसोबत केले असे काही...
बाप की वैरी ! वडिलांनी मुलीसोबत केले असे काही...
img
दैनिक भ्रमर
गुरुग्राम येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे.  भारतातील एका युवा टेनिसपटूची हत्या करण्यात आली आहे. गुरुग्राम येथे राहणाऱ्या राधिका यादव या टेनिसपटूची तिच्या घरातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येचा आरोप तिच्या वडिलांवरच असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील गुरुग्राम येथील सुशांत लोक फेज-2 या उच्चभ्रू वसाहतीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. असे सांगितले जात आहे की, 25 वर्षीय टेनिसपटू राधिका हिच्यावर तिच्या वडिलांनीच घरात गोळ्या झाडल्या, ज्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना सोसायटीतील फ्लॅट क्रमांक E-157 मध्ये घडली, जिथे हे कुटुंब बऱ्याच काळापासून राहत होते. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि रील्स हे या हत्येमागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी वडील आपल्या मुलीच्या सोशल मीडियावरील व्हिडिओ पोस्ट करण्याच्या सवयीमुळे अत्यंत नाराज होते आणि याच रागातून त्यांनी आपल्या मुलीचा जीव घेतला, अशी चर्चा आहे.

 राधिकाची कारकीर्द
राधिका यादवला कोर्टवर फारसे यश मिळू शकले नाही. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे (ITF) असलेल्या नोंदींनुसार, वरिष्ठ गटात (सीनियर लेव्हल) राधिकाने केवळ 3 व्यावसायिक सामने खेळले होते आणि त्या सर्वांमध्ये तिला पराभव पत्करावा लागला होता. तर, कनिष्ठ गटात (ज्युनियर लेव्हल) तिने 1 सामना जिंकला होता, आणि 2 सामन्यांमध्ये तिला पराभव स्वीकारावा लागला होता.













इतर बातम्या
Join Whatsapp Group