प्रेम कधी होईल कोणावर होईल काही सांगता येत नाही. योग्य व्यक्तीवर योग्य वयात झालं तर ठीक नाहीतर गंभीर परिणामांचा सामना अनेकांनी केला आहे. त्यात विवाहबाह्य संबंध एक मोठी समस्या बनत चालला आहे. नवी मुंबईत देखील विवाहबाह्य संबंधाचा शेवट नवऱ्याच्या हत्येने झाला. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई येथील पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या 22 वर्षीय मुलाचे मागील अडीच वर्षापासून एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध होते. याबाबतची माहिती तिच्या पतीला समजताच त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, यावरून त्यांच्यात अनेकवेळा भांडणही झाले. मात्र तरीही पत्नीचे अनैतिक संबंध सुरूच राहिल्याने पती थेट तिच्या प्रियकराच्या घरी गेला.
मंगळवारी रात्री पती प्रियकराच्या घरी गेला आणि त्यांच्यात वाद झाला, वाद इतका टोकाला गेला की, आरोपीने घरातील फावडा पतीच्या डोक्यात घालून त्यानंतर हत्येची खातरजमा करण्यासाठी गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपीने मयत व्यक्तीला नवी मुंबईतील वाशी खाडी किनारी नेऊन फेकून दिले. आता याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.