किरकोळ कारणावरून एकाची हत्या, 'ही'  क्षुल्लक चूक भोवली
किरकोळ कारणावरून एकाची हत्या, 'ही' क्षुल्लक चूक भोवली
img
Vaishnavi Sangale
वाढती गुन्हेगारी महाराष्ट्राची गंभीर समस्या बनत चालली आहे. क्षुल्लक कारणावरून लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कारणावरून तरुणाला दोन दिवस डांबून ठेवत अमानुष मारहाण करण्यात आली ज्यात तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. अविनाश गोरोबा सगट असं मृत तरुणाचं नाव आहे. 

अविनाशच्या आई केशरबाई सगट यांच्या तक्रारीनुसार,  अविनाश मासे घेण्यासाठी गावातील वैभव सगट यांच्या घरी गेला होता. त्यावेळी घरात कुणी नसल्याने तो आत गेला असता विमल सगट हिने त्याच्यावर आरडाओरडा केला. त्यानंतर गावातील काही तरुणांनी मिळून त्याला रस्त्यावर पकडून जबरदस्तीने मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा अविनाशला जबरदस्तीने मोटारसायकलवरून उचलून अंजनपूर कोपऱ्याजवळील कॅनल परिसरात त्याला बांबूच्या काठ्या, लाकडी दांडके आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. 

शरीरभर मार लागल्याने आणि पोटात गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती खालावली. त्याला अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group