तुळजापूर येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. संग्राम पाटील त्यांची पत्नी आणि त्यांची आई चित्रा पाटील एकत्र राहत होते. त्यांच्या आईच्या गळ्यात नेहमी दीड तोळ्याचे गंठण, पाटल्या असे 15 ते 16 तोळे सोने असायचे. त्यांच्या शेजारी २१ वर्षीय ओम निकम राहत होता. चित्रा पाटील या ओमला त्यांच्या मुलाप्रमाणेच जपत होत्या. त्याच्या सुख दुःखात त्याला साथ होत्या. पण त्यांचा हा प्रामाणिकपण त्यांना चांगलाच भोवला.
ओम निकम याचा चित्र पाटील यांच्या सोन्यावर डोळा होता. तो नेहमी घरी येत-जात असायचा. सोबतच त्याच्या लग्नाची व लग्न ठरल्याची बोलणी करायचा. 18 जुलै रोजी चित्रा पाटील या घरी नव्हत्या त्यावेळी त्यांच्या मुलाने घरी आल्यावर पत्नीस विचारले की, आई कुठे आहे? तेव्हा त्या फोन आल्यावर ओम निकमसोबत कुठेतरी गेल्याचे त्यांनी सांगितले. रात्री उशीर होऊनही आई घरी परत न आल्याने संग्राम पाटील यांनी ओम निकम याला अनेक फोन केले. मात्र त्याने आई सोबत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली असता पोलिसांनी तपास सुरु केला.
या तपासादरम्यान अखेर बेपत्ता असणाऱ्या चित्रा पाटील यांचा मृतदेह सोलापूर ते लातुर बायपास रोडवरील नळदुर्ग रोड ब्रिजजवळ सापडला. मात्र त्यांच्या अंगावर दागिने नव्हते. त्यामुळे सोन्यासाठी त्यांचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. धक्कादायक म्हणजे हा खून ओम पाटील यानेच खून करून दागिने पळवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.