धक्कादायक! ४ वर्षांनी भेट, त्याने तिला एकांतात भेटायला बोलावलं; आणि बंद खोलीतच तिला...
धक्कादायक! ४ वर्षांनी भेट, त्याने तिला एकांतात भेटायला बोलावलं; आणि बंद खोलीतच तिला...
img
Vaishnavi Sangale
गाजियाबाद इथे नाल्यात सापडलेल्या महिलेच्या मृत्यूचे रहस्य अखेर पोलिसांनी उलगडलं आहे. २८ जुलैला सैन विहार परिसरात एका नाल्यात महिलेचा मृतदेह सापडला होता. एका चादरीत हा मृतदेह गुंडाळला होता. या महिलेची २ दिवसापूर्वी हत्या झाली असून तिच्या डोक्यावर एका अवजड वस्तूने वार केल्याचे रिपोर्टमधून कळले. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. 

धक्कादायक ! सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडून हिट अँड रन; विद्यार्थ्याला चिरडून पळाली, अखेर अभिनेत्रीला अटक

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. सीसीटीव्ही तपासले असता पोलीस आरोपीपर्यंत पोहचली. आरोपी हा सैन विहार परिसरातील मोहम्मद उर्फ राजू हा होता. राजूची पोलीस चौकशी केली असता ही महिला दिल्लीत राहणारी असून ती सेक्स वर्कर होती असं उघड झाले. अनेक वर्षापासून राजू आणि मृत महिलेची मैत्री होती. परंतु मध्यंतरी दोघांमधील संपर्क तुटला. ४ वर्षांनी महिला आणि राजूची पुन्हा भेट झाली. त्यानंतर पुन्हा दोघे जवळ आले. एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू झाले. 

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : निकाल ऐकताच साध्वी प्रज्ञासिंह यांना कोसळलं रडू, म्हणाल्या लोक...

२६ जुलैला महिला राजूच्या घरी गेली होती. तिने राजूकडे सोबत राहण्याचा हट्ट धरला. जेव्हा ही महिला राजूच्या घरी पोहचली तेव्हा तिने सोन्याचे दागिने घातले होते. राजूची नजर त्या दागिन्यांवर पडली. त्याने दागिने हडप करण्याचा डाव रचला. ही महिला झोपलेली असताना राजूने तिच्या डोक्यात वीट घालून तिला ठेचून मारले. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. हत्येनंतर राजूने तिचा मृतदेह दुचाकीवर घेऊन जात हायवेशेजारी असलेल्या नाल्यात फेकून दिला अशी कबुली आरोपीने पोलीस चौकशीत दिली. पोलिसांनी आरोपीकडून दुचाकी, हत्येसाठी वापरलेली वीट, ३९ हजार रुपये आणि दागिने जप्त केले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group