Nashik : इंदिरानगर परिसरात एकाची हत्या, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या घटनेने शहरात खळबळ
Nashik : इंदिरानगर परिसरात एकाची हत्या, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या घटनेने शहरात खळबळ
img
दैनिक भ्रमर
नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाथर्डी फाट्यावरील एका कॅफेमध्ये भरदिवसा खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पाच जणांचे टोळके एके कॅफेमध्ये शिरले त्यांनी धारदार कोयत्याने वार करत राशीद हारून शेख नामक युवकाची हत्या केली. 

नाशिक शहरातील सातपूर येथील श्रमिकनगर भागात बुधवारी रात्री २२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच इंदिरानगर येथे भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी झालेल्या या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेत पाच आरोपी निष्पन्न झाले आहे. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.  मात्र, बुधवारी रात्रीच एक खुनाची घटना घडलेली असताना पुन्हा एकदा गुरुवारी दुपारी खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.

गाडी नीट चालवता येत नाही का ? या क्षुल्लक कारणातून श्रमिकनगर परिसरात दुचाकीवरून जाणार्‍या जगदीश वानखेडे (वय २२) या युवकाशी परिसरातील आठ-दहा युवकांनी वाद घालत त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करत त्याची हत्या बुधवारी रात्री केली होती. आता इंदिरानगर येथे हत्येची घटना घडली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हत्येमुळे आणि नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिक पोलिसांचा धाक संपल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरु झाली आहे. 


Murder |
इतर बातम्या
Join Whatsapp Group