२६ जुलै २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बिल्डिंगजवळील विलायती चिंचेचे झाड कुठलीही परवानगी न घेता तोडल्याप्रकरणी बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मनपाच्या पश्चिम विभागाचे उद्यान निरीक्षक किरण बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी प्रकाश पुसाराम लढ्ढा हे कॅनडा कॉर्नरवरील बिझनेस स्क्वेअर बिल्डिंगचे मालक आहेत. या बिल्डिंगजवळ एक विलायती चिंचेचे झाड होते. हे झाड लढ्ढा यांनी मनपाची परवानगी न घेता अनधिकृतपणे तोडले.
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लढ्ढा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar