भीषण अपघात ! महिला गंभीर जखमी, २ ते ३ वाहनांना धडक ; चालक पोलिसांच्या ताब्यात
भीषण अपघात ! महिला गंभीर जखमी, २ ते ३ वाहनांना धडक ; चालक पोलिसांच्या ताब्यात
img
Dipali Ghadwaje
धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड सिटी येथे एका चारचाकी वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या एका दुचाकीला तसेच दोन इतर चारचाकी वाहनांना जोराची धडक दिली. एक महिला गंभीर जखमी झाली आहे, याप्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

या अपघाताच्या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार , चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या एका दुचाकीला तसेच दोन इतर चारचाकी वाहनांना जोराची धडक दिली. यात एक महिला गंभीर जखमी झाली असून हा अपघात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नांदेड सिटीतील डीसी मॉलजवळ घडला.  याप्रकरणी संतोष शिवाजी गायकवाड या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालक संतोष गायकवाड हे शिक्षक असून ते आपल्या चारचारकी वाहनाने मावळ येथे असणाऱ्या शाळेत निघाले होते. दरम्यान नांदेड सिटीतील डीसी मॉलजवळ आल्यानंतर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांनी समोर असलेल्या दुचाकीवरील महिलेला धडक दिली. तसेच आणखी दोन ते तीन वाहनांना जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. 

अपघात झाल्यानंतर जमलेल्या जमावाने वाहनचालक गायकवाड यांना जबर मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले असून वैद्यकीय चाचणीसाठी व उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group