मनी लॉण्डरिंग केसमध्ये अटकेचा धाक दाखवून 31 लाखांचा ऑनलाईन गंडा
मनी लॉण्डरिंग केसमध्ये अटकेचा धाक दाखवून 31 लाखांचा ऑनलाईन गंडा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मनी लॉण्डरिंग केसमध्ये अटक करण्याचा धाक दाखवून तपासाच्या नावाखाली ईडी व सीबीआयच्या तोतया अधिकार्‍यांनी रक्कम जमा करण्यास सांगून एका डॉक्टरसह उद्योजकाला सुमारे 31 लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुबोध गोविंद परदेशी (वय 41, रा. निर्मल गोविंद व्हिला, अशोका मार्ग, वडाळा शिवार, नाशिक) हे डॉक्टर आहेत. दि. 17 ते 25 मे यादरम्यान फिर्यादी परदेशी यांच्यासह साक्षीदार जोगेंदर सिंह यांना घरी असताना 919411146297 आणि 917592272099 या मोबाईल क्रमांकांवरून कॉल आला. त्या फोनवर बोलणार्‍या इसमाने त्यांना सांगितले, की तुमच्या नावाच्या एका पार्सलमध्ये ड्रग्ज मिळून आले आहे.

तुमच्या आधार नंबरवरील मोबाईल क्रमांक चुकीच्या कामासाठी वापरला जात आहे, असे सांगून फिर्यादी परदेशी व सिंह यांना स्काय पेवर व्हिडिओ कॉलवर कनेक्ट होण्यास भाग पाडले. त्यानंतर मोबाईलवरून बोलणार्‍या इसमांनी मुंबई पोलीस, सीबीआय व ईडीच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी केली, तसेच तुम्ही दोघेही मनी लॉण्डरिंग केसमध्ये सहभागी आहात, असे सांगून या केसमध्ये अटक करण्याचा धाक दाखविला,

तसेच या केसमधून बाहेर पडण्यासाठी काही तरी तडजोड करावी लागेल, असे सांगून केसच्या तपासाच्या नावाखाली अज्ञात इसमाने वेगवेगळ्या बँक खात्यांवर फिर्यादी परदेशी यांना 23 लाख 10 हजार 677 रुपये व साक्षीदार जोगेंदर सिंह यांना 7 लाख 64 हजार 129 असे दोघांचे मिळून एकूण 30 लाख 74 हजार 806 रुपये वर्ग करण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर सुबोध परदेशी यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीची फिर्याद दिली असून, याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group