काही दिवसांआधी कोलकाताच्या आरजी कार महाविद्यालयात अतिशय दुर्दैवी घटना घडली असून , एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार होऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात आला. यादरम्यान , कृत्याविरोधात येथील डॉक्टरांनी आंदोलन पुकारल्यानंतर हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न काही लोकांकडून करण्यात आला. या सर्व घडामोडींमध्ये या रुग्णालयाच्या प्राचार्यच बदलण्यात आले आहेत. आता या जागी सुश्रीता पाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, पदभार स्वीकारताच त्यांनी डॉक्टरांवर संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी मध्यरात्री जमावाने केलेल्या हल्ल्याबाबत तत्काळ कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या मागणी पूर्ण कराव्यात अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात येत होती. परंतु, यावरून सुश्रीता पाल यांनी संताप व्यक्त केला. “मला काही अधिकृत काम करण्यासाठी एक तास हवा आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे, मी जाणार नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका”, असं सुश्रीता पाल म्हणाल्या.