धक्कादायक : तलाठी कार्यालयातच तलाठ्याचा खून , कुठे घडली घटना , वाचा
धक्कादायक : तलाठी कार्यालयातच तलाठ्याचा खून , कुठे घडली घटना , वाचा
img
DB
हिंगोली : हिंगोलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोलीत एका तरुणाने तलाठ्याला चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगावामध्ये ही घटना घडली आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात महसूल प्रशासनातील तलाठ्याला चाकूने भोसकून ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जीवघेण्यात हल्ल्यात तलाठी संतोष पवार जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.

शासकीय काम करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत तरुणाने संतापाच्या भरात तलाठ्याला संपवल्याचा भयंकर प्रकार घडला आहे.

तरुणाने तलाठी कर्तव्य बजावत असलेल्या आडगावमधील कार्यालयात दुचाकीवर येत हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. तलाठ्याची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. या घटनेतील आरोपीचे नेमकं नाव काय आहे, हे कळू शकलेले नाही. तलाठ्याकडून कोणत्या कामाची अडवणूक झाली हे देखील स्पष्ट झालेलं नाही.  या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group