मन सुन्न करणारी  घटना ! आधी केली आईची हत्या आणि नंतर इंस्टाग्राम ला पोस्ट, म्हणाला ..
मन सुन्न करणारी घटना ! आधी केली आईची हत्या आणि नंतर इंस्टाग्राम ला पोस्ट, म्हणाला ..
img
दैनिक भ्रमर
गुजरातमधल्या  राजकोटमध्येही एका मुलाने आपल्या आईची हत्या करून सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्राम ला पोस्ट टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे ,  एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामला आईसह स्वत:चा फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिलं माफ कर आई, मी तूझी हत्या केली. तूझी नेहमीच आठवण येईल, ओम शांती या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान , घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला असून आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. 

राजकोटमधल्या युनिव्हर्सिटी रोडवर 48 वर्षांची ज्योतिबेन गोसांई ही आपल्या मुलाबरोबर राहात होती. ज्योतिबेन हिला मानसिक आजार होता. ही महिला दररोज आपल्या मुलाशी भांडण करायची. तिच्यावर उपचारही सुरु होते. पण काही दिवसांपासून ज्योतिबेनने गोळ्या घेणं बंद केलं होतं. गोळ्या बंद झााल्याने तिचा स्वभाव आणखी तापट झाला होता. तिच्या स्वभावामुळेच पतीने तिच्याबरोबर घटस्फोट घेतला होता. दररोजच्या भांडणाला कंटाळून 21 वर्षांच्या निलेश नावाच्या मुलाने आईचा गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर आईबरोबरचा एक फोटो त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला. फोटोवर त्याने 'Sorry mom, I killed you, I miss you' असं लिहिलं. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. 

माहितीनुसार आईची हत्या केल्यानंतर निलेशने पोलिसांना फोन करुन आपण आई ज्योतिबेन गोसांईची हत्या केल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला. तर निलेश गोसांईला आईच्या हत्येप्रकरणी अटक केली. पोलिसांच्या चौकशी निलेशने धक्कादायक कबुली दिली. आधी चाकूने आईची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण आईने चाकू हिसकावून घेतला. त्यानंतर चादरीने तिचं तोंड दावलं, ज्यात तिचा मृत्यू झाला. 

दरम्यान , पोलिसांनी ज्योतीबेनच्या पतीला याबाबत माहिती दिली. पण त्याने ज्योतीबेनचा मृतदेह घेण्यास नकार दिला. ज्योतीबेनबरोबर आपला काहीही संबंध नसल्याचं त्याने पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेशला तुरुंगात पाठवलं असून अधिक तपास सुरु आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group