धक्कादायक बातमी : महाराष्ट्रातून मागील ३ वर्षांत 'इतक्या' मुली बेपत्ता ; धडकी भरवणारी आकडेवारी वाचा
धक्कादायक बातमी : महाराष्ट्रातून मागील ३ वर्षांत 'इतक्या' मुली बेपत्ता ; धडकी भरवणारी आकडेवारी वाचा
img
Dipali Ghadwaje
वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रा तून गायब असल्याची माहिती देणारी जनहित याचिका सांगली येथील शहाजी जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार वर्ष २०१९ मध्ये ३५ हजार ९९०, वर्ष २०२० मध्ये ३० हजार ८९ आणि वर्ष २०२१ मध्ये ३४ हजार ७६३ इतक्या १८ वर्षांवरील युवती महाराष्ट्रा तून हरवल्या आहेत. या याचिकेत त्यांनी न्यायालयाची निरीक्षणेही नोंदवनों ली आहेत.

जगताप यांची विज्ञान शाखेच्या तिसर्‍या वर्षाला शिकणारी मुलगी डिसेंबर २०२१ पासून हरवली आहे. सांगली येथील संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही तेथील पोलीस मुलीचा शोध घेऊ शकलेले नाहीत. जगताप यांना असे समजले आहे की, त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे आणि तिचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आहे.

जगताप यांनी याचिकेत म्हटले आहे की, ते गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत केवळ २ मिनिटे त्यांच्या मुलीला भेटू शकले आणि त्यांच्या कुटुंबापासून तिचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मुलगीअल्पवयीन नसल्याने पोलिसांनी तिला शोधण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. हरवलेल्या मुलींचेलीं चेछळ किंवा बळजबरीने  धर्मांतर झालेले असू शकते . 
इतर बातम्या
Join Whatsapp Group