मुंबई : अनेकांना झोपेत चालण्याची सवय असते असं आपण यापूर्वीही ऐकलं आहे. पण, याच झोपेत चालण्याच्या सवयीमुळे एका 19 वर्षांच्या तरुणाचा नाहक बळी गेल्याची घटना भायखळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. माझगाव येथे राहणाऱ्या चुनावाला कुटुंबातील 19 वर्षांच्या मुलाचा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन कोसळून मृत्यू झाला आहे. झाल्याची घटना भायखळा परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुस्तफा इब्राहिम चुनावाला असं या मृत तरुणाचं नाव आहे. चुनावाला यांना एक 19 वर्षांचा मुलगा होता. सहाव्या मजल्यावरुन पडल्यानंतर मुस्तफा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला सेफी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत मुस्तफाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भायखळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या चुनावाला कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुस्तफाला झोपेत चालण्याची सवय होती. 30 जूनच्य मध्यरात्री मुस्तफा झोपेत चालत असताना सहाव्या माळ्यावरून खाली पडला. मुस्तफा तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला. त्यानंतर त्याला तात्काळ सेफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.