पुणे : पूर्ववैमनस्यातून अंगरक्षक असलेल्या तरुणावर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. पिस्तुलातून गोळी न उडाल्याने तरुण बचावला असून, याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका ठेकेदारास अटक केली. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. विजय केशवराव घुमारे (50, रा. बुधवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी प्रसाद भोसले (34, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. भोसले अंगरक्षक (बाउन्सर) म्हणून काम करतो. आरोपी घुमारे आणि भोसले यांच्यात वाद झाला होता.