..... म्हणून झालं कडाक्याचं भांडण;  बायकोच्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू,
..... म्हणून झालं कडाक्याचं भांडण; बायकोच्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू,
img
Dipali Ghadwaje
मुंबई : नवरा बायकोत नेहमीच भांडण होत असतं. त्यात नवीन काही नाही. परंतु कधी कधी हे भांडण अगदी शेवटच्या टोकाला देखील जावू शकतं. अशीच एक घटना मुंबईतील चेंबूरमधून समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  येथील  एका जोडप्याच्या भांडणात नवऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बायकोच्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूरच्या माहुलमध्ये घडली आहे.  धनजी मकवाना आणि जया नावाचे दाम्पत्य चेंबूरच्या माहुलमध्ये आपल्या दोन मुलांसोबत राहत होते. धनजी मकवाना उदरनिर्वाहासाठी मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होते.

परंतु त्यांना दारूचे व्यसन होते. मकवाना दारू प्यायचे म्हणून नवरा बायकोमध्ये नेहमी वाद व्हायचे. धनजी आणि जयामध्ये दारूवरून जोरदार भांडण झाले. शाब्दिक वाद थेट हाणामारीपर्यंत गेला. तेव्हा वैतागलेल्या जयाने धनजी यांच्या पोटात जोरात लाथ मारली. बेशुद्ध धनजीला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान धनजीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृत धनजीची पत्नी जया मकवाना हिच्यावर आयपीसी कलम 304 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. 


 
crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group