सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात ; दोन्ही सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात ; दोन्ही सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मुंबईतील बहुचर्चित कीर्ती व्यास हत्या प्रकरणात सत्र न्यायालयानं निकाल दिला आहे. न्यायालयानं तिचे सहकारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अंधेरीतील बीब्लंट सलूनमध्ये हे तिघेही काम करत होते. कीर्तीच्या हत्या प्रकरणात सोमवारी न्यायालयानं दोषी ठरवलं. 

कीर्ती व्यास हत्या प्रकरण 

मुंबईतील एका प्रसिद्ध सलून ब्रँडमध्ये किर्ती व्यास मॅनेजर पदावर काम करत होती. आरोपी सिद्धेश आणि खुशीही तिथेच काम करत होते. खराब परफॉमन्सबद्दल मॅनेजर किर्तीनं सिद्धेशला एका महिन्याची नोटीस दिली होती. याचा राग मनात धरून सिद्धेशनं खुशीच्या मदतीनं चालत्या गाडीत किर्तीची हत्या केली होती. या हत्येचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यात सिद्धेश किर्तीच्या घराजवळ दिसून आला होता, त्यानंतर या हत्येचं बिंग फुटलं. मात्र शोध घेऊनही वडाळा खाडीत टाकलेला किर्तीचा मृतदेह सापडलाच नाहीये.
crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group