सिडकोत सापडल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा
सिडकोत सापडल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की अशोक अण्णा पगार (वय 45, रा. सिन्नर) व हेमंत लक्ष्मण कोल्हे (वय 32, रा. साईबाबानगर, सिडको) यांच्याकडे विक्रीसाठी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांच्या ताब्यातून पाचशे रुपयांच्या तीस बनावट नोटा व 50 रुपये रोख व सॅमसंग कंपनीचा मोबाईल व बजाज मोटारसायकल असा एकूण 22 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

या दोघांनी नोटा कुठून आणल्या व हे कुठे विक्री करणार होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत.

crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group