रिक्षावर झाड कोसळून ४ जण जखमी
रिक्षावर झाड कोसळून ४ जण जखमी
img
दैनिक भ्रमर

रिक्षावर झाड कोसळून ४ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

पुण्यातील कोथरूड भागात ही घटना ९ वाजेच्या सुमारास घडली. यात रिक्षाचालकासह ४ जण जखमी झाले. कोथरूडमधील दशभुजा गणपती मंदिराजवळ हे झाड रिक्षावर पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी रिक्षा चालकासह चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रिक्षाचे मोठा नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे कोथरूड केंद्रप्रमुख गजानन पाथरूडकर आणि राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी रिक्षावर पडलेले झाड बाजूला काढले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group