अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात, गुपचूप उरकलं लग्न
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात, गुपचूप उरकलं लग्न
img
दैनिक भ्रमर
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ' हीरामंडी’ या वेब सीरिजमधून आपल्या अदांनी चाहत्यांना वेड लावणारी फेमस अभिनेत्री अदिती हैदरी विवाह बंधनात अडकली आहे. रंग दे बसंती’ फेम लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ ह्याचा सोबत आदिती  लग्नबंधनात अडकली आहे. अदितीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना सुखद दिला आहे. अदिती-सिद्धार्थचे निवडक मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे.

अदिती-सिद्धार्थचा विवाहसोहळा दाक्षिणात्य पद्धतीनुसार पार पडला. अभिनेत्रीने लग्नात गोल्डन जरी एम्ब्रॉयडरी असलेली सोनेरी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. तर, सिद्धार्थने दाक्षिणात्य परंपरेनुसार पांढरा कुर्ता घालून लुंगी नेसली होती. अदितीने शेअर केलेल्या फोटोंनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघेही या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. या जोडप्याने तेलंगणा वानपर्थी येथील 400 वर्षे जुन्या मंदिरात त्यांचा विवाहसोहळा आयोजित केला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group