मुंबईतील भाजप मेळाव्यात अमित शाहांचं मोठं विधान ; म्हणाले '2029 मध्ये फक्त भाजप......
मुंबईतील भाजप मेळाव्यात अमित शाहांचं मोठं विधान ; म्हणाले '2029 मध्ये फक्त भाजप......
img
Dipali Ghadwaje
आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनितीसाठी अमित शाह मुंबईत आले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी निवडणुकीसाठी कानमंत्रही दिलाय. 2024 मध्ये महायुतीचं सरकार येणार असंही शाह म्हणाले आहेत. मात्र त्याचवेळी अमित शाहांनी केलेल्या एका विधानामुळे सध्याची महायुती 2029 मध्ये असणार की नाही या चर्चांना उधाण आलंय. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहा मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतले भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत आहेत. आणि हाच संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मुंबईतल्या भाषणात सर्वात मोठं विधान केलंय. 

जे सरकार बनवतो तेच निवडणुक जिंकतात. आपण केंद्रात सलग तिसरं सरकार बनवले. आपली निराशा झटकून टाका, कोणताही सर्व्हे वगैरेचा विचार करू नका. यंदा 2024 ला महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपाचे सरकार आणायचे आहे. असा नारा अमित शाहांनी दिला. स्वबळावर भाजप सरकार आणायचं आहे हा नारा अमित शाहांनी एकदा नाही तर दोनदा दिला.
 
महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे.. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत भाजपसोबत आहेत.. महायुती म्हणून 2024 च्या निवडणुकीला सामोरं जाणार असंच महायुतीचा प्रत्येक नेता म्हणतोय. मात्र त्याचवेळी अमित शाहांनी 2029 साठी स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांचं काय होणार? अमित शाहांच्या स्वबळाच्या विधानाचा नेमका अर्थ काय असे अनेक सवाल सध्या उपस्थित होतायत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group