देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि शेतकरी नेते पाशा पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. "हर्षवर्धन तुमच्या सगळ्यांचे अध्यक्ष आता तुमचे वकील झाले आहेत. जेव्हा पण मला हर्षवर्धन भेटतो तेव्हा माझा गळा पकडतो आणि म्हणतो आमचा इथेनॉल घ्या. तुम्ही फक्त दोन वर्ष धीर धरा, मोदी एक प्लेटफॉर्म विकसित करत आहेत. तुम्ही जितका इथेनॉल तयार कराल तो सगळा विकत घेतला जाईल", असं अमित शाह म्हणाले आहेत.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या कार्यक्रमाला दिल्लीतील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यावेळी ते बोलत होते. गृहमंत्री अमित शाह तसेच साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
काय म्हणाले अमित शाह ?
अमित शाह म्हणाले, इथेनॉल मका, बांबू, तांदूळ पासून इथेनॉल बनला पाहिजे. समोर पाशा पटेल बसले आहेत, चष्मा पण बांबूचा घालतात. महाराष्ट्रवाले बहुत डिमांड करते हैं, विचारलं की पैसे कुठून मिळणार? तुम्हाला जितका निधी पाहिजे तितका तुम्हाला मिळेल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.