शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येताच हर्षवर्धन पाटलांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले..
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येताच हर्षवर्धन पाटलांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले..
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय पक्षांत मोठमोठ्या घडामोडींना वेग आला असून ,एन निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या खेळी सुरू झाल्या आहेत. 
 दरम्यान भाजपाला रामराम ठोकत ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला पाटील घराण्यातील सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अप्रत्यक्ष सहभाग होता, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. “सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत. आमची बहीण चार वेळा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या. तीन वेळा त्यांना जिंकविण्यात आमचा प्रत्यक्ष सहभाग राहिला. परंतु यंदाच्या वेळी त्यांना मताधिक्य देण्यात आमचा अप्रत्यक्ष सहभाग होता”, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. भाजपमध्ये राहूनही पर्यायाने महायुतीत भाग असूनही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी काम केले नाही, अशी अप्रत्यक्ष कबुलीच हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेताच दिली.

दरम्यान , हर्षवर्धन पाटील यांच्या  प्रवेशाने पवार-पाटील या घराण्याातील जवळपास ४० वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. बारामती आणि इंदापूरमध्ये गेली दोन दशके छुपा संघर्ष असायचा. आघाडीत असूनही अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचे. परंतु आता हर्षवर्षन पाटील यांनीच हाती तुतारी घेतल्याने ज्येष्ठ नेते म्हणून पुणे जिल्ह्याचे नेतृत्व आपसुकच त्यांच्याकडे आले.  .
इतर बातम्या
Join Whatsapp Group