शरद पवारांची ताकद वाढणार ; 'हे' दोन उपाध्यक्ष पक्षात प्रवेश करणार
शरद पवारांची ताकद वाढणार ; 'हे' दोन उपाध्यक्ष पक्षात प्रवेश करणार
img
दैनिक भ्रमर
बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. शरद पवारांचे बेरजेच्या राजकारणाचे समीकरण येथे यशस्वी होताना दिसत आहे. आता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व असणारे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे शरद पवारांना साथ देणार असल्याचे समजते.

तसेच इंदापूरचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा आणि निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे हे दोघे शरद पवारांच्या पक्षात जाणार आहेत. मंगळवारी इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

‘पीएचडी’ प्रवेशासाठी पहिल्यांदाच ‘ही’ ऑनलाइन परीक्षा

यामुळे शरद पवार यांच्या पक्षाची ताकद इंदापूरमध्ये वाढणार आहे. याचा लाभ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना होईल. आप्पासाहेब जगदाळे यांचे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व आहे. तर कमयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांचे इंदापूर शहारत वर्चस्व आहे. तर निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांचीही या भागात मोठी ताकद आहे.

कर्मयोगी व नीरा भीमा हे दोन सहकारी साखर कारखाने भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहेत. दोन्ही कारखान्याचे उपाध्यक्ष करणार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याने शरद पवारांची इंदापुरात ताकद वाढणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group