राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणखी एका सदस्याने दिला राजीनामा
राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणखी एका सदस्याने दिला राजीनामा
img
Dipali Ghadwaje
पुणे :  मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु आहे. या सगळ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्य मागासवर्ग आयोगही चर्चेत आला आहे.

दरम्यान  राज्य मागासवर्ग आयोगात राजीनामा सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.  अशातच  आज पुन्हा सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चार दिवसात हा दुसरा राजीनामा आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य असलेले लक्ष्मण हाके यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. 

यापूर्वी बबनराव तायवाडे, संजय सोनवणे, बी. एल. किल्लारीकर आणि आता लक्ष्मण हाके यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आयोगाच्या बैठकीत माझ्या आणि आयोगाच्या वैचारिक मतभेदांमुळे व्यथित होऊन आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

एकीकडे राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय होत असतानाच दुसरीकडे मात्र आयोगाच्या सदस्यांचे राजीनामा सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group