पुणे, नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, वाहनांच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
पुणे, नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, वाहनांच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून अनेकांना यात आपला जीव देखील गमवावा लागत असल्याच्या घटना घडत आहेत. अशातच पुणे नाशिक महामार्गावर पेठ घाटात भीषण अपघात झाला आहे.  पेठ घाटात टेम्पो, कंटेनर आणि कारचा तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू झालाय, तर एक गंभीर जखमी आहे.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , पहाटे सहा वाजेदरम्यान हा अपघात झाला आहे. अपघातात कारने अचानक पेट घेतलयने तिघांचा आगीत होरपळून मृत्यु झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. रोहिदास राक्षे, विराज कदम, आणि अंकुश भांबुरे असे अपघातात होरपळुन मृत्यु झालेल्या तरुणांची नावे आहेत.   

या अपघातामुळे महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती.   घाटात उतारावर कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group