महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; १० ठार तर १९ जखमी
महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; १० ठार तर १९ जखमी
img
दैनिक भ्रमर
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जात असताना झालेल्या अपघातात १० भाविकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे भाविक प्रवास करत असलेली कार बसला धडकल्याने हा अपघात झाल्याचे समजते. या दुर्घटनेत १९ जण जखमी झाले असून प्रयागराज-मिर्जापुर महामार्गावर मेजा भागात बोलेरो कार बसला धडकल्याची माहिती मिळत आहे.

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातून प्रयागराज येथील संगमावर स्नान करण्यासाठी हे भाविक जात होते. भाविकांना घेऊन जाणारी बोलेरो मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातून येणार्‍या बसला धडकली. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा अपघाताची तत्काळ दखल घेतली असून अधिकार्‍यांना तातडीने मदतकार्य करण्याच्या तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group