अमेरिकेची फर्म मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. जगभरातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांनी आपली बादशाहत कायम ठेवली आहे. अमेरिकेची फर्म 'मॉर्निंग कंसल्ट'च्या ग्लोबल रेटिंगमध्ये ७७ टक्के लोकांनी मोदींना लोकप्रिय नेता म्हणून मत दिलंय.
मॉर्निंग कन्सल्टच्या रेटिंगनुसार, पंतप्रधान मोदींना ७७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर १७ टक्के लोकांनी त्यांना नापसंती दर्शवली आहे. याशिवाय ५ टक्के लोकांनी मोदींबाबत कोणतेही मत व्यक्त केले नाही. विशेष बाब म्हणजे, रेटिंगच्या बाबतीत पंतप्रधान मोदींच्या कुणी आसपास देखील नाहीये.
जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मेक्सिकोचे नेते आंद्रेस लोपेझ ६४ टक्के रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर स्वित्झर्लंडचे आलियान बारसेट ५७ टक्के मान्यता रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे.
पोलंडचे डोनाल्ड टस्ट ५० टक्के रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा ४७ टक्के रेटिंगसह पाचव्या, ऑस्ट्रेलियाचे नेते अँथनी अल्बानीज ४५ टक्के रेटिंगसह सहाव्या, इटलीचे जॉर्जिया मोलोनी ४४ टक्के रेटिंगसह सातव्या, स्पेनचे पेड्रो ३८ टक्के रेटिंगसह आठव्या, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन नवव्या स्थानावर आहेत. कॅनडाचे जस्टिन ट्रुडो यांनी ३५ टक्के रेटिंगसह दहावा क्रमांक पटकाविला आहे.