कोरोनामध्ये मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींना डॉमिनिका या देशाने आपला सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉमिनिका सरकारने म्हटले की, कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिका या महिन्यात पंतप्रधान मोदींना आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ प्रदान करणार आहे.
कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकामध्ये मोदींचे योगदान आणि दोन्ही देशांमधील भागीदारी मजबूत करण्याच्या त्यांच्या समर्पणाची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जाणार आहे.
डॉमिनिकाच्या कॉमनवेल्थच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जॉर्जटाउन, गयाना येथे होणाऱ्या आगामी भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेत हा पुरस्कार प्रदान करतील, असे डॉमिनिकन पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.