मुख्यमंत्र्यांना तरुणाने लिहले रक्ताने पत्र ; आरक्षणासाठी रक्त सांडायलाही......
मुख्यमंत्र्यांना तरुणाने लिहले रक्ताने पत्र ; आरक्षणासाठी रक्त सांडायलाही......
img
Dipali Ghadwaje
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा बारावा दिवस आहे.आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या बारा दिवसांपासून आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्यात यावा, अशी मागणी करत परतूर तालुक्यातील युवकाने मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहले आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत परतूर तालुक्यातील खडके गावच्या गजानन चवडे या युवकाने  आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्यात यावा.. अशी मागणी या पत्रामधून करण्यात आली आहे.

स्वत:च्या समाजासाठी आज मराठा युवक जागा झाला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक युवक आपले रक्त सांडायला मागे सरणार नाहीत. सर्व समाजाची भावना लक्षात घेऊन सरकारने मराठा समाजाच्या मागणीचा गांभियाने विचार करावा, असा इशाराही या पत्रामधून देण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group