नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न समारंभात पोलिस आले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
लग्न मंडपात नवरदेव नवरी हे दोघे ही स्टेजवर उभे होते. स्टेजवर पोलिसांनी नवरीला एकच प्रश्न विचारला, आणि अवघ्या काही मिनिटांत लग्न मोडलं. लग्न मोडल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूर येथील कळमना परिसरातील विजयनगर भागात घडली आङे. गुरुवारी गावात एकाच लग्न होते. लग्नासाठी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून मुलाची वरात नागपूरमध्ये आली.
नेमकं काय घडले?
गावात लग्नाची संपुर्ण तयारी झाली होती. तेवढ्यात पोलिसांसह जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या पथकाने लग्नमंडपात हजेरी लावली. पोलिसांना पाहून लग्नात आलेल्या पाहुण्यांना घाम फुटला. पोलिसांनी आई वडिलांकडे मुलीचा वयाच्या दाखल आणि कागदपत्रे मागितली. सुरुवातीला त्यांनी कागदपत्रे देण्यास नकार दिला.
त्यानंतर पोलिसांनी धाक दाखवला. अधिकाऱ्यांनी मुलीला जन्म तारीख विचारली तेव्हा मुलीने तिचे वय सांगितले.मुलीचे वय अवघे १५ वर्ष होते. बाल संरक्षण पथकाने आई वडिलांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देऊ नये हे बेकादेशीर असल्याचे सांगितले. त्यानंतर बालविवाह रोखण्यात आला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.