बाप रे!- अवैध दारु विक्रीसाठी देवघराचा वापर? कुठे घडली ही घटना
बाप रे!- अवैध दारु विक्रीसाठी देवघराचा वापर? कुठे घडली ही घटना
img
Jayshri Rajesh
दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारु विक्रीचा एक अनोखा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात अवैध दारु विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर  करण्यात आला आहे. त्यामुळे छुप्या मार्गाने दारु विक्रीसाठी आता देवाचाही आधार घेतला जात असल्याचे उदाहरणच वर्ध्यातून समोर आले आहे. 

यापूर्वीही दारु विकण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत दारू विक्रेत्यांकडून वर्ध्यात दारु विकली जात असल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, दारु विक्रेत्यांनी आता देवालाही सोडलं नसल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

अवैध दारु विक्रीसाठी देवघर?

वर्ध्याच्या गणेश नगर येथील एका दारु विक्रेत्याने चक्क देवघरातच दारूची साठवणूक करून तेथून दारु विक्री चालविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी अचानक धाड टाकत घराची झडती घेतली. सुरुवातीला पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही,

 पोलिसांनी ज्यावेळी घराच्या आत असलेल्या देवघरात पाहणी केली त्यावेळी देवघरात देवाच्या आसनाच्याखाली असलेल्या ड्रॉवरमध्ये दारुसाठा सापडला. याशिवाय काही बॉटल फ्रीजमध्ये देखील सापडल्या आहेत. पोलिसांनी हा दारुसाठा जप्त केला असून, दारु विक्रेत्यालाही बेड्या ठोकल्या आहेत.

 24 हजारांचा मुद्देमाल जप्त

आशिष उर्फ पिंटू कन्हैयालाल जयस्वाल (रा. गणेशनगर) असे या दारु विक्रेत्याचे नाव आहे. लाकडाच्या मोठ्या देवघरात खालच्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये विदेशी दारुच्या बॉटल्स दडवून ठेवण्याची ही शक्कल पोलिसांना देखील आश्चर्यचकित करणारी ठरलीय. तसेच घरातील फ्रिजमध्ये गावठी मोहाची दारु आढळून आलीय. पोलिसांनी दारुसह फ्रिज,असा  24 हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय. सोबतच आशिष जयस्वाल यालाही अटक केलीय.पोलीसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group