दारु विक्रेत्याचा अनोखा प्रताप; सुरु केलं चालत फिरतं दारूचं दुकान
दारु विक्रेत्याचा अनोखा प्रताप; सुरु केलं चालत फिरतं दारूचं दुकान
img
Jayshri Rajesh
हरिद्वार, उत्तराखंडमध्ये पोलिसांनी चालत फिरतं दारूचे दुकान चालवणाऱ्या एका तस्कराला पकडले आहे. हा व्यक्ती हरिद्वारच्या दारू प्रतिबंधित भागात देशी-विदेशी दारू अवैधरित्या विकत होता. त्याने शर्टमध्ये दारूच्या बाटल्या लपवल्या होत्या. पकडल्यानंतर पोलिसांनी त्याला शर्टात लपवलेल्या बाटल्या बाहेर काढायला सांगितल्याने तो एक एक करून बाहेर काढू लागला.

एक एक करून त्याच्या शर्टच्या आतून एकूण 48 दारूच्या बाटल्या बाहेर काढल्या. हे पाहून तेथे उपस्थित असलेले पोलीस आणि इतर लोकही आश्चर्यचकित झाले. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हरिद्वारच्या हर की पैडी पोलिस चौकीत 25 जून रोजी पोलिसांनी 24 वर्षीय सज्जन कुमार नावाच्या दारू तस्कराला अटक केली होती. दारू प्रतिबंधित परिसरात फिरत असताना आरोपी शर्टमध्ये लपवून दारू विकत होता.

पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी पोलिसांच्या सूचनेनुसार आरोपीने शर्टाच्या आतून दारूच्या बाटल्या काढण्यास सुरुवात केली तेव्हा तेथे उपस्थित सर्वांचेच डोळे चक्रवाले. एकामागून एक तस्करांनी शर्टाच्या आतून एकूण 48दारूच्या बाटल्या बाहेर काढल्या.

आरोपी सज्जन कुमार हा शिवकुटिया, हरिद्वारचा रहिवासी असुन. याबाबत पोलीस अधिक कारवाई करत आहे.   
इतर बातम्या
Join Whatsapp Group