पुणे मुंबईनंतर आता नागपुरातही हिट अँड रन : मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवले
पुणे मुंबईनंतर आता नागपुरातही हिट अँड रन : मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवले
img
Dipali Ghadwaje
पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असताना नागपुरात रात्री मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवल्याची घटना घडली आहे. नागपूर पोलिसांनी या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले त्यात एक महिला, एक पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे. पुण्यातील प्रकरणानंतर पोलिसांवर झालेल्या टीकेनंतर काळजी घेऊन नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणात आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पावले उचलली आहे.

 नागपुरात झेंडा चौकामध्ये शुक्रवारी रात्री ‘हिट अँड रन’ची घटना घडलेली आहे. दारू आणि गांजा सेवन करून बेदारकपणे वाहन चालवणाऱ्यांनी पायी जाणाऱ्या तिघांना उडवला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तिन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये 32 ग्राम गांजा जप्त केला. त्यात दोन विदेशी दारूच्या दोन बॉटल मिळून आल्या आहेत. लोकांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गाडीत बसलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली. त्यात कारचालक आणि कारमध्ये बसलेले तिघांनी दारूचे सेवन केल्याचा संशय असून पोलिसांनी त्यांना मेडिकलसाठी पाठवले आहे. तसेच त्यांच्या गाडीतून बिअरच्या बॉटल सुद्धा मिळून आल्या आहेत. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group