संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (३० जून) दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होतात. या सोहळ्याचे क्षण कैद करण्यासाठी काहीजण ड्रोन कॅमेऱ्याच्या वापर करून चित्रीकरण करतात. मात्र, या ड्रोनचा गैरवापर देखील होवू शकतो, ही बाब लक्षात घेऊन पोलिस परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण मनाई करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्यात खासगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. खासगी चित्रीकरण करायचे असल्यास, त्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यासाठी पोलिस परवानगी आवश्यक असून त्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात परवानगीसाठीचा अर्ज करावा लागणार आहे. विना परवानगी चित्रीकरण केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
अशी मिळणार परवानगी
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यासाठी पोलिस परवानगी आवश्यक असून त्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात परवानगीसाठीचा अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची तपासणी करून त्याला मंजुरी द्यायची की, नाही याचा निर्णय पोलिस घेणार आहे. ड्रोनसाठी परवानगी घेण्याचा पोलिसांचे आदेश तीन जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.
संभाव्य घातपाती कारवाया, तसेच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणाचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांनी चित्रीकरण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.