पोलिसांची धडाकेबाज कारवाई; जप्त केला ४० किलो गांजा
पोलिसांची धडाकेबाज कारवाई; जप्त केला ४० किलो गांजा
img
Jayshri Rajesh
लासलगाव :- सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास  थडीसारोळे गावात स्थानिक गुन्हे शाखा आणि लासलगाव पोलीस कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने धडाकेबाज कारवाई करत   16 प्लास्टिक पॅकेट मध्ये पॅक केलेला अंदाजे 40 किलो ग्रॅम वजनाचा दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा गांजा आणि टाटा   ए.सी. ए  गाडी असा चार लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लासलगाव पोलिसांनी जप्त केला  दोन सफेद रंगाच्या गोण्यागध्ये भरुन टाटा ACE वाहन क्रमांक MH-13-CJ-0513 हिचे मध्ये टाकुन सिन्नर येथील संदीप रामनाथ सानप हा  पळून गेला आहे.

अत्यंत गुप्तता पाळखत बाळगत काल रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील ,  लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे स्थानिक गुन्हा शाखेचे हवालदार शांताराम घुगे , लासलगावचे पोलीस कर्मचारी सुजय बारगळ , संदीप शिंदे औदुंबर मुरडणर आणि संदीप डगळे यांच्या पोलीस  पथकाने ही कारवाई केल्याने गांजा सारखा मोठा अंमली पदार्थ हाती लागला आहे

याबाबत स्थानिक गुन्हा शाखेचे मालेगाव पथकाचे पोलीस हवालदार शांताराम पंढरीनाथ घुगे यांनी फिर्याद दिली असून संदिप रामनाथ सानप रा. सिन्नर ता. सिन्नर (फरार) हा फरार झाला आहे. 1जुलै रोजी साडेअकरा वाजेचे  सुमारास थडी सारोळे गावच्या शिवारातील नांदुरमध्यमेश्वर ते थडी जाणारे रोडलगत असलेल्या अशोक नागरे यांचे शेतातील पत्र्याचे शेड जवळ दोन लाख पाच हजार रुपयांचा गाजा जप्त केला असून 2,00,000/- रुपये किंमतीची एक सफेद रंगाची टाटा कंपनीची ACE मॉडेल क्रमांक MH-13-CJ-05133 गाडी, असा एकुण ४ लाख ५ हजारांचा मुद्देमाल लासलगावचे  पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी ताब्यात घेतला आहे. 

 पुढील तपास लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे करीत आहेत. तसेच पोलीस फरार झालेला आरोपी संदिप रामनाथ सानप रा. सिन्नर ता. सिन्नर याचा शोध घेत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group