नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेमध्ये रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याने चाहत्यांसह त्याच्या कुटुंबियांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
गुरुचरण सिंग असे या अभिनेत्याचे नाव आहे. गुरुचरण यांचा शोध पोलीसही घेत आहेत. पण त्यांचा तपास अजून लागलेला नाही. गुरुचरण सिंग याच्या वडिलांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, 4 दिवसांपूर्वी गुरुचरण सिंग याने वडिलांचा वाढदिवस साजरा केला होता.
सोशल मीडियावर अभिनेत्याचा 4 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.