कोरोनानंतर मागील तीन वर्षे विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. यंदा उन्हाळी सत्राच्या परीक्षा वेळेवर पार पडत असून, पुढील शैक्षणिक वर्ष पूर्ववत होईल, असा विश्वास विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नुकतेच विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव विद्याशाखा आणि आतंरविद्याशाखांचे शैक्षणिक वेळापत्रक घोषित केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांचे पहिले सत्र २० जून पासून सुरू होत आहे. तर दिवाळीच्या सुट्ट्या या २१ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान असतील.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता विद्यापीठाकडून शैक्षणिक वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांशिवाय बहुतेक सर्व महाविद्यालये २० जून रोजी सुरू होत आहे. तर औषधनिर्माणशास्त्र आणि वास्तुशास्त्राची महाविद्यालये एक जुलै पर्यंत सुरू होणार आहे.
बहुतेक पदवी अभ्यासक्रम एक जुलै ते १८ जुलै दरम्यान सुरू होणार आहे. पुढील उन्हाळी सत्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचा विचार आहे. तर उन्हाळी सत्राच्या परीक्षा एप्रिल- मे २०२५ मध्ये घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
महत्त्वाच्या तारखा
पावसाळी (विषय सत्रे) सत्राचा कालावधी : २० जून ते २१ ऑक्टोबर २०२४
उन्हाळी (सम सत्रे) सत्राचा कालावधी : २ डिसेंबर २०२४ ते ३० एप्रिल २०२५