शरद पवारांचा भाजपला दुसरा मोठा धक्का, आणखी एक नेता तुतारी फुंकणार
शरद पवारांचा भाजपला दुसरा मोठा धक्का, आणखी एक नेता तुतारी फुंकणार
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आल आहे. राजकारणातील पक्षांत नेत्यांच्या इनकमिंग आणि आउटगोइंग सुरु आहे. दरम्यान, शरद पवार यांचा गट अक्शन मोडवर आला असून भाजपला धक्क्यावर धक्के देत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता पुणे जिल्ह्यात भाजपला दुसरा धक्का बसणार आहे. राज्यसभेचे माजी खासदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात दाखल होणार आहेत. 

काकडेंच्या पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर दिग्गज नेते भाजपला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठे धक्के बसताना दिसत आहेत. समरजीत घाडगे, हर्षवर्धन पाटील, त्यानंतर आता संजय काकडे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी औपचारिक बैठक करून दसऱ्यानंतर पक्षप्रवेश करणार असल्याचं काकडे यांनी स्पष्ट केलंय.

संजय काकडे यांनी यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. भाजपमध्ये मला सध्या कुठलंही काम नसून नुसतं पदावर राहण्यात काहीच अर्थ नाहीय. त्यामुळे मंगळवारी ते भाजप राज्य उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. माझ्यासोबत पुण्यातील 10 ते 15 माजी नगरसेवक आणि आणि काही माजी आमदार संपर्कात असल्याचा दावा काकडेंनी केलाय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group