महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चांगलाच खाली येताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने अंदमानातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे.
राज्यात थंडीची लाट पसरली असून संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. सध्या मुंबईकर देखील गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. राज्यातील तापमानाचा पारा १० च्या खाली गेला आहे. धुळ्यामध्ये सर्वात नीचांकी ४.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
येत्या काही दिवसांत राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून धुळे, परभणी, निफाड, जेऊर, अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा येथे किमान तापमान 10 अंशांपेक्षा कमी नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिक गुलीबी थंडीचा अनुभव घेत आहे.