मोठी बातमी : पुणे विमानतळाला ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज’ यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर
मोठी बातमी : पुणे विमानतळाला ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज’ यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र विधानसभेत पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

पुढील आवश्यक कारवाईसाठी आणि विमानतळाच्या नावात बदल करण्यासाठी हा ठराव आता केंद्राकडे पाठवण्यात येईल.  त्यानंतर विमानतळाचे नामांतर करण्यात येईल.

महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ११० अन्वये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव मांडला आणि तो विधानसभेने मंजूर केला. पुणे विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव महाराष्ट्र मंत्रिमंडळाने याआधीच मंजूर केला आहे.

पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी मांडला होता. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group