धावत्या स्कूल बसला अचानक लागली आग  , बसमध्ये 35 चिमुकले.... ; कुठे घडली घटना?
धावत्या स्कूल बसला अचानक लागली आग , बसमध्ये 35 चिमुकले.... ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथून  एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  या गावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या धावत्या स्कूल बसने अचानक पेट घेतला. या बसमध्ये तब्बल 35 विद्यार्थी होते. या बसने अचानक पेट घेतल्यामुळे धावपळ उडाली.

मात्र बसमधील दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे 35 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. आमठाणा गावाजवळ बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार स्कूल बसला लागलेली आग विझवण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

घाटनांद्रा येथून शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस निघाली होती. ही बस आमठाणा येथे असताना त्यातून धूर निघू लागला. बस चालकाला ही बाब लक्षात आली. त्याने लागलीच वाहन थांबवले. यावेळी बसमध्ये दोन शिक्षक बसले होते. त्यांनी प्रसंगावधान राखत सर्व मुलांना तातडीने खाली उतरवले. सर्व मुले बसमधून खाली उतरवल्यावर काही क्षणात बसला आग लागली.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group