NCERT चा मोठा निर्णय! इंडिया नाही आता भारतच, सर्व पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार
NCERT चा मोठा निर्णय! इंडिया नाही आता भारतच, सर्व पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार
img
Dipali Ghadwaje
NCERT नं मोठा निर्णय घेतला आहे. आता  शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये  इंडिया या शब्दाऐवजी 'भारत' हा शब्द वापरण्यात येणार आहे. यापुढे National Council of Educational Research and Training म्हणजेच NCERT च्या पुस्तकात इंडिया हा शब्द दिसणार नाहीये या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द पुस्तकात असणार आहे. 'भारत' शब्दाच्या उल्लेखाच्या प्रस्तावाला NCERT ने मंजुरी दिली आहे. 

NCERT नं पुस्तक निर्मितीसाठी 19 सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. NCERT पुस्तकात इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा, या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. आता NCERT पुस्तके छापली जातील तेव्हा या पुस्तकांमध्ये  इंडिया या शब्दाच्या ऐवजी  भारत हा शब्द वापरण्यात येणार आहेत.

त्यासोबतच प्राचीन इतिहास या शब्दाच्या ऐवजी शास्त्रीय इतिहास हा शब्द वापरण्यात येणार आहे.  
india | NCERT |
इतर बातम्या
Join Whatsapp Group