भारताच्या हाती लागला खजिना !  ''हे'' जिल्हे होणार मालामाल, काय आहे प्रकार जाणून घ्या
भारताच्या हाती लागला खजिना ! ''हे'' जिल्हे होणार मालामाल, काय आहे प्रकार जाणून घ्या
img
दैनिक भ्रमर
भारताच्या हाती मोठा खजिना लागल्याची बातमी समोर आलीये .भारतात  उत्खननादरम्यान वेळोवेळी या खनिजांचे साठे आढळून येतात. कधी सोन्याची खाण सापडते तर कधी इतर मौल्यवान खनिजांचा खजिना सापडतो. आता बारा जिल्ह्यांमध्ये दुर्मिळ खनिजांचा साठा सापडल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व 95 टक्क्यांनी कमी होईल, असं सांगितलं जात आहे.

राजस्थानातील बारा जिल्ह्यांमध्ये दुर्मिळ खनिजांचा साठा सापडला आहे. या खनिजांचा शोध घेण्यासाठी राज्यात रेअर अर्थ एलिमेंट एक्सलन्स सेंटर स्थापन करण्याची योजना आखली जात आहे. या सेंटरच्या माध्यमातून राज्यातील खनिजांचा शोध घेतला जाणार आहे. सेंटरच्या स्थापनेसाठी खाण विभागातील संशोधन कामगार देशातील अनेक संस्था आणि तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. असं राजस्थानचे खाण सचिव आनंदी यांनी सांगितलं. 

दरम्यान सध्या राजस्थानच्या बारा जिल्ह्यांमध्ये दडलेली खनिजे असल्याचे समोर आले असून, यामध्ये बाडमेर, जालोर, सिरोही, पाली, उदयपूर, भिलवाडा, नागौर, अजमेर, जयपूरचे नीमकथाना, राजसमंद, सीकर आणि बांसवाडा यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या संशोधनात या जिल्ह्यांमध्ये दडलेली खनिजे असल्याचे निदर्शनास आले आहे. तज्ज्ञांच्या मते, कार्बोनेटाइट्स आणि मायक्रोग्रॅनाइट खडकांमध्ये बस्तानासाइट, ब्रिटोलाइट, सिंकाइसाइट आणि झेनोटाइम दुर्मिळ पृथ्वी घटकांचे साठे आहेत.

त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू तयार करण्यासाठी कारखानेही उभारले जातील. त्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि रोजगारही वाढेल. जे खनिज सापडेल त्यातून संबंधित उत्पादनांचा उद्योगही निर्माण होईल. अशा स्थितीत उद्योगांनाही चालना मिळेल.  बॅटरी, लेझर बॅटरी इत्यादी खनिजांपासून बनवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या खनिजांमुळे देशाचे चीनवरील अवलंबित्व 95 टक्क्यांनी कमी होईल, असं तज्ज्ञांच म्हणणे आहे. यासोबतच देशात कच्च्या मालावर प्रक्रियाही सुरू होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group